अक्षय कुमारच्या हाऊसफुल ५ या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर सध्या चांगला प्रतिसाद मिळत असून पाचव्या दिवशी ११ कोटींपेक्षा जास्त कमाई केली, जी एक चांगला आकडा मानली जाते. या सिनेमाने गेल्या पाच दिवसात ११६ कोटींची कमाई केली असून जगभरातील कमाईचा विचार केला असता १३७ कोटींचा गल्ला आतापर्यंत जमवला आहे. हा सिनेमा २२५ कोटी रुपये बजेट खर्च करुन बनवण्यात आला असून आतापर्यंत पाच दिवसात ५२ टक्के बजेट रिकव्हर झालं आहे. येत्या काळात हा सिनेमा पूर्ण खर्च वसूल करण्याची शक्यता आहे.
हाऊसफुल ५ ची जोरदार कमाई, पाचव्या दिवशी किती कमावले?
