भारतात ईव्ही कारमध्ये टाटा आणि महिंद्रा यांची टक्कर सुरु असतानाच आता व्हीएतनामच्या कंपनीनेही यात एंट्री केली आहे. Vinfast VF6 या कारच्या फर्स्ट लूकने सर्वांचं लक्ष वेधलंय. या नव्या गाडीच्या इंटेरिअर लूकविषयी सध्या ज़ोरदार चर्चा सुरु आहे. क्रेटा ईव्ही, कर्व, बीएस ६ या गाड्यांना व्हिएतनामची कंपनी टक्कर देणार आहे. ही गाडी भारतात सप्टेंबरमध्ये लाँच होणं अपेक्षित असून २५ लाखांच्या आसपास किंमत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच महिंद्राने बीएस ६ ही ईव्ही लाँच केली होती, तर ह्युंदाई सुद्धा ईव्हीमध्ये एंट्री करत आहे.
टाटा, महिंद्राच्या ईव्हीला टक्कर, व्हिएतनामच्या कंपनीने आणली स्वस्त ईव्ही कार
