पुणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर; नगरसेवकांची संख्या किती?

पुणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर नगरसेवकांची संख्या किती

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता असून पुणे महापालिकेने २०११ च्या जनगणने नुसार आपली प्रभाग रचना आणि नगरसेवकांची संख्या जाहीर करण्याचे आदेश राज्यसरकारच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिका प्रभाग चार सदस्यीय असणार आहे. त्यामुळे पुण्यात आता ४२ प्रभागात १६५ नगरसेवक असतील.

२०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात पुणे महापालिकेची मुदत संपल्यानंतर प्रशासक काम पाहत आहेत. न्यायालयीन प्रक्रियामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळोवेळी पुढं जात होत्या मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्यात येणार आले आहेत. त्यानुसार नगरविकास विभागाने २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार महापालिकेची प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले. त्यामुळं पुणे महापालिकेत ४२ प्रभाग असणार असून प्रत्येकी ४ सदस्य असे १६५ नगरसेवक असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *