भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेम हा सन्मान मिळाल्यानंतर सुरेश रैनानेही मन जिंकणारा मेसेज लिहिला आहे. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीला आयसीसीकडून सोमवारी हा मान मिळाला. हा मान मिळवणारा तो भारताचा अकरावा खेळाडू ठरला. आयसीसीकडून शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर पाच वर्षांनी हा किताब दिला जातो. क्रिकेटमधील अपवादात्मक योगदानासाठी आजपर्यंत जगभरातील दिग्गजांचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. एक दिग्गज हॉलमध्ये प्रवेश करतोय. धोनी भाईचा एक फिनिशिर ते लीडर आणि सर्वोत्तम क्रिकेटर हा प्रेरणा देणारा प्रवास पाहता तो या किताबाचा खरा मानकरी आहे, अशी पोस्ट सुरेश रैनाने लिहिली.
धोनीला आयसीसीचा खास सन्मान, मित्र सुरेश रैनाच्या मेसेजनेही मन जिंकलं
