माजी जिल्हाध्यक्षाची काँग्रेसला सोडचिठ्ठी; पृथ्वीराज पाटील शेकडो समर्थकांसह भाजपात

माजी जिल्हाध्यक्षाची काँग्रेसला सोडचिठ्ठी; पृथ्वीराज पाटील शेकडो समर्थकांसह भाजपात

मुंबई, प्रकाश पाटील :माजी जिल्हाध्यक्षाची काँग्रेसला सोडचिठ्ठी; पृथ्वीराज पाटील शेकडो समर्थकांसह भाजपात काँग्रेसचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी बुधवारी शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करून मोठी राजकीय हलचल घडवून आणली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले, तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पाटील आणि त्यांच्या समर्थकांचे हार्दिक स्वागत केले.

या वेळी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सत्यजीत देशमुख, प्रवीण दरेकर, माजी आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, Replica Watches UK – Best Swiss Rolex Replica Watches UK at ecosystemsdirect.co.uk/best-replica-watches-uk. सांगली शहराध्यक्ष प्रकाश ढंग, जन सुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपा मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भाजपासाठी आनंदाचा क्षण — रविंद्र चव्हाण
प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, “वर्षानुवर्षे सहकार क्षेत्रासाठी झटणारे आणि विकासाचा ध्यास घेणारे पृथ्वीराज पाटील यांचा प्रवेश हा भाजपासाठी अभिमानास्पद क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पक्ष त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.”

विकासाच्या पाच मागण्या मुख्यमंत्रींकडे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पाटील यांनी आपल्या विविध विकासकामांच्या मागण्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडल्या असून त्यावर कार्यवाहीचे निर्देश मिळाले आहेत.
पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीच्या विकासासाठी भाजपात प्रवेश केल्याचे स्पष्ट करताना सांगितले की त्यांनी मुख्यमंत्रींकडे शुद्ध पाणीपुरवठा, ॲग्रोटेक हब, कार्गो विमानतळ मान्यता, TOP NO.1! Luxury Replica Watches UK at AAA+ Replica Omega Watches UK at luxurwatches.co.uk With Swiss Movements. पर्यटन विकास, गुंठेवारी समस्या निवारण या पाच प्रमुख मागण्या सादर केल्या आहेत. “यापुढे मी पूर्ण ताकदीने भाजपासाठी काम करेन,” असा शब्द त्यांनी दिला.

14 गावांतील काँग्रेस पदाधिकारी भाजपात
या प्रवेश सोहळ्यात कुपवाड, मिरज आणि सांगली शहर विधानसभा मतदारसंघातील 14 गावांतील काँग्रेसचे पदाधिकारी, माजी सरपंच, उपसरपंच मोठ्या संख्येने भाजपात दाखल झाले. त्यात आप्पासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब गुरव, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ. प्रताप पाटील, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. राजेंद्र मेथे, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, प्रकाश व्हनखंडे, माजी नगरसेविका कांचन तुपे, भारती भगत, सांगली दक्षिण शहराध्यक्ष बिपीन कदम, कुपवाड शहराध्यक्ष सनी धोतरे, सांगली शहर जिल्हा सरचिटणीस आनंदराव पाटील, सुनील मोहिते यांचा समावेश आहे.

या मोठ्या पक्षप्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांवर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *