शरद पवारांची मंडल यात्रा म्हणजे ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा डाव

शरद पवारांची मंडल यात्रा म्हणजे ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा डाव

पुणे :शरद पवारांची मंडल यात्रा म्हणजे ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा डाव शरद पवार यांनी नागपूर येथून सुरू केलेली मंडल यात्रा ही ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा डाव आहे. Rolex Replica Watches UK Online Store, Buy Cheap swiss made Replica Rolex With 80% Discount, Fast Delivery and Free Worldwide Shipping.कारण येणाऱ्या २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे मुंबईला मोर्चा काढत असून त्या विरोधात ओबीसींनी एकत्रितपणे ताकद दाखवू नये आणि ओबीसी मध्ये फूट पडावे तसेच जरांगेंचा मोर्चा यशस्वी व्हावा यासाठीच शरद पवार यांनीही यात्रा काढली असल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

हाके यांनी याविषयी एक पोस्ट लिहिली आहे त्यात ते म्हणतात,
शरद पवारांची मंडल यात्रा म्हणजे ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा डाव अघटीत वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था…..
श्री शरदचंद्र पवार साहेबांनी आता ओबीसींची झुल पांघरली आहे. नागपूर मधून मंडल यात्रा सुरु केली आहे. इच्छाधारी नागाप्रमाणे भूमिका बदलण्यात शरद पवार पटाईत आहेत. मनोज जरांगेंना मांडीवर घेवून गोंजारनारे पवार अचानक ओबीसींची बाजू घेण्याच्या तयारीत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते ओबीसींचा विषय हाताळण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय.

पवारांची ही यात्रा म्हणजे जखम मांडीला आणि मलम ‘दुसरीकडे कुठंतरी….’ अशी परिस्थिती आहे. ही म्हण वापरण्याचं कारण म्हणजे ओबीसींना देशोधडीला लावणारा माणूस आज यात्रा काढतोय, आमची मागणी साधी आहे. ओबीसी, भटके विमुक्त, मायक्रो ओबीसींसाठीच्या २० महामंडळांना प्रत्येकी पाचशे कोटी निधी, महाज्योतीच्या इमरातीसाठी २ हजार कोटींचा निधी. विद्यार्थ्यांसाठीच्या वस्तीगृहांसाठी मोक्याची जागा मिळावी. ओबीसींबद्दल खरंच तळमळ असती तर शरद पवारांनी यात्रा काढली नसती तर विरोधक म्हणून सरकार वर तुटून पडले असते पण नाही, आपल्या सख्ख्या पुतण्याचे चारभिंतीत कान धरले असते. निधी मंजूर करुन घेतला असता तर यात्रेची गरज भासली नसती.

शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट करतात ही त्यांची ख्याती आहे. म्हणजे पवारांनी ओबीसींसाठी मोर्चा काढला, याचा उलटा अर्थ म्हणजे त्यांना जरांगेंना मदत करायची आहे. ती कशी? कारण जरांगे २९ ऑगस्टला मुंबईला मोर्चा काढत आहेत. त्यांच्याविरोधात ओबीसींनी एकदिलानं ताकद दाखवू नये. ओबीसींमध्ये फुट पडावी. जरांगेंचा मोर्चा यशस्वी व्हावा. यासाठी शरद पवारांनी ही यात्रा काढली आहे का? हा मोर्चा काढावा म्हणून कोणता ओबीसी नेता त्यांच्या दारात गेला होता? याचं उत्तर शरद पवारांनी दिलं पाहिजे.

होय शरद पवार अँटी ओबीसीच आहे. पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांनी आपल्या सभा ओबीसी नेत्यांच्याच मतदारसंघात घेतल्या होत्या. ओबीसींसाठीच्या योजना, महामंडळं त्यांनीच बंद पाडली. ओबीसींसाठी स्वतंत्र महामंडळ देण्याची युतीची परंपरा पवारांनी खोडून काढली. स्वतःच्या कुटुंब -भावकीचं, पै पाहुण्याचं राजकारण टिकवण्यासाठी ओबीसीं राजकारणाला संपवण्याचं काम पवारांनी केलं. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

शरद पवारांचं आजवरचं राजकारण फोडा आणि राज्य करा असंच आहे. ओबीसींमध्ये फुट पाडून लाडक्या जरांगेचा हट्ट पुरवायचा आहे. हे न समजण्याइतका ओबीसी दुधखुळा नाही. येत्या निवडणूकीत शरद पवारांच्या फुटीतरतावादी राजकारणाला कायमचा पुर्णविराम लावण्याचं काम इथला जातीवंत ओबीसी करेल. हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *