शेती विक्रीस विरोध, आईचा खून करुन मुलाने घेतला गळफास, रेणापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

शेती विक्रीस विरोध, आईचा खून करुन मुलाने घेतला गळफास, रेणापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

लातूर, माणिक मुंडे :शेती विक्रीस विरोध, आईचा खून करुन मुलाने घेतला गळफास, रेणापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना रेणापूर तालुक्यातील सांगवी येथील शेती विक्रीस विरोध करणाऱ्या वयोवृध्द आईचा जमीन विक्रीच्या वादातून एकूलत्या एक मुलाने आईचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ७ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या दुर्दैवी प्रकारामुळे रेणापूर तालुक्यातील सांगवी परिसरात शोककळा पसरली आहे.

शेती विक्रीस विरोध, आईचा खून करुन मुलाने घेतला गळफास, रेणापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना रेणापूर तालुक्यातील सांगवी येथील रहीवाशी आसलेल्या सुमिंद्राबाई वेणूनाथ जाधव (वय ७०) यांच्या नावे असलेली शेती विकावी, असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब वेणूनाथ जाधव (वय ४८) मागील काही दिवसांपासून करत होता. मात्र आईने ठाम नकार दिल्याने काकासाहेब रागाच्या भरात शेतात गेले. तिथे त्यांनी आईचा तोंड दाबून आणि गळा आवळून खून केला. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह उसाच्या शेतात पुरून टाकण्यात आला.आसल्याची रेणापुर पोलीस ठाण्यात शुभम काकासाहेब जाधव यांनी फिर्याद दिल्यावर वरुन रेणापुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

घटनेची माहिती मिळताच घटना स्थळीअप्पर पोलीस अधीक्षक चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी चौधरी,स्थानिक गुन्हे शाखेचे निकम,रेणापुर पोलीस स्टेशनचे सपोनि पाटील,आदींनी भेट दिली.पुढील तपास पोलीस जमादार मामडगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *