उद्धव ठाकरे ‘सनातन’ विरोधी वक्तव्यांशी सहमत आहेत का? भाजपा प्रवक्त्यांचा सवाल

उद्धव ठाकरे 'सनातन' विरोधी वक्तव्यांशी सहमत आहेत का? भाजपा प्रवक्त्यांचा सवाल

उद्धव ठाकरे ‘सनातन’ विरोधी वक्तव्यांशी सहमत आहेत का? भाजपा प्रवक्त्यांचा सवाल मालेगाव प्रकरणानंतर पुन्हा ‘भगवा दहशतवाद’चा फेक नॅरेटिव्ह पुढे रेटला जातोय, केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई, प्रकाश पाटील :उद्धव ठाकरे ‘सनातन’ विरोधी वक्तव्यांशी सहमत आहेत का? भाजपा प्रवक्त्यांचा सवाल भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत जोरदार आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निर्दोष हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची न्यायालयीन मुक्तता झाल्यानंतरही काँग्रेसकडून ‘भगवा दहशतवाद’चा खोटा नॅरेटिव्ह पुन्हा पुढे रेटला जातो आहे, असा आरोप त्यांनी केला.

आव्हाडांच्या वक्तव्यांना उद्धव ठाकरेंची संमती? भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत त्यांच्या हिंदुविरोधी वक्तव्यांचा निषेध केला. याबाबत बोलताना उपाध्ये म्हणाले की, “हिंदुत्ववादी असल्याचा दावा करणारे उद्धव ठाकरे आव्हाडांच्या वक्तव्यांवर गप्प का आहेत? ते सहमत आहेत का?” तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत, “हिंदुत्वाचा मुखवटा घालून चालणारे ठाकरे आता काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. सनातन धर्माविरोधातील गरळ ओकणाऱ्यांविरोधात ते का बोलत नाहीत?” असा थेट सवाल केला.

गांधींच्या लेखाचा दाखला
पत्रकार परिषदेत उपाध्ये यांनी महात्मा गांधींनी १९२१ साली ‘यंग इंडिया’मध्ये प्रसिद्ध केलेल्या लेखाचा दाखला देत म्हटले की, “गांधींनी वेद, उपनिषदे आणि पुराणांवर विश्वास असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. गांधींनी स्वतःला सनातनी हिंदू मानले होते.”

रोहित पवारांवरही टीकास्त्र
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावरही भाजपाने झडप घातली. एका प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे नसताना अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणण्याचा आरोप उपाध्ये यांनी केला. “पोलिसांवर झुंडशाही करत दबाव टाकण्याचे प्रकार अत्यंत घातक आहेत. अशा प्रकारांना शरद पवारांनी मान्यता दिली आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *