बीड जिल्ह्यातील दरोड्याच्या तयारीत असलेली गुन्हेगारांची टोळी लातूरमध्ये जेरबंद

बीड जिल्ह्यातील दरोड्याच्या तयारीत असलेली गुन्हेगारांची टोळी लातूरमध्ये जेरबंद

लातूर, माणिक मुंडे :बीड जिल्ह्यातील दरोड्याच्या तयारीत असलेली गुन्हेगारांची टोळी लातूरमध्ये जेरबंद लातूर जिल्हातील औसा, किल्लारी, भादा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर भागात गेल्या काही दिवसापासून घरफोडी तसेच दुकानाचे शटर तोडून चोरीच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान ०२ ते ०३ ऑगस्ट २०२५ च्या पहाटे रात्रग्रस्त असलेल्या औसा व भादा च्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना नागरीकांकडून मिळालेल्या माहीतीनुसार एक एक चारचाकी मालवाहू वाहन संशयीतरित्या औसा तूळजापूर रोडवर फिरत होते. त्यानंतर संशयित वाहन नागरीकांचे मदतीने शिवली मोड परीसरातून ताब्यात घेतले. सदर वाहनातील ईसमांस ताब्यात घेतले त्या वाहनातून तीन ईसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेले उर्वरीत पाच संशयित इसमांना ताब्यात घेतले.

बीड जिल्ह्यातील दरोड्याच्या तयारीत असलेली गुन्हेगारांची टोळी लातूरमध्ये जेरबंद ताब्यात घेतलेले सर्व आरोपी बीड जिल्हातील असून त्यांचे नावे रिहान मुस्तफा शेख वय २० वर्षे रा. गौतम नगर परळी, अन्वरखॉ जलालखॉ पठाण वय २४ वर्षे रा. गौतम नगर परळी, हफिज मुमताजोददीन शेख वय ३६ वर्षे रा.आझाद नगर परळी, सादेक मोहम्म्द यासिन मोहम्मद वय ४४ वर्षे रा.जुना बाजार, फारुख नबी शेख वय २७ वर्षे रा. बार्शी नाका, बीड अशी आहेत. त्याचे ताब्यातील चारचाकी मालवाहू अशोक लिलाँड टेम्पो क्रमांक एमएच ४४ यू ३२९८ ची झडती घेतली.

बीड जिल्ह्यातील दरोड्याच्या तयारीत असलेली गुन्हेगारांची टोळी लातूरमध्ये जेरबंद असता त्यामध्ये दरोडासाठी लागणारे साहीत्य एक लोखंडी कोयता, एक धारदार चाकू, दोन लाकडी दांडके, एक लोखंडी पार, दोन लोखंडी कटावणी, एक स्टील रॉड, एक लोखंडी कोयता, एक धारदार चाकू, लाकडी दांडके दोन, एक लोखंडी पार, दोन लोखंडी कटावणी, एक स्टील रॉड, एक चौकोनी स्टीलचा पाईप, दोन लोखंडी पाईप, तीन बनावट रेडीयमचे वाहनाचे नंबर प्लेट, एक लोखंडी पट्टी, दोन स्कूड्रायव्हर, एक लोखंडी साखळी, एक ग्राइंडर मशीन, एक अशोक लिलॉड कंपनीचा टॅम्पो असा एकूण दोन लोखंडी पाईप,

तीन बनावट रेडीयमचे वाहनाचे नंबर, एक लोखंडी पट्टी, दोन स्क्रू ड्रायव्हर, एक लोखंडी साखळी, एक ग्राइंडर मशीन, एक अशोक लिलाँड कंपनीचा टेम्पो व चार मोबाईल जूने वापरते एकून कींमत अंदाजे 07 लाख 71 हजार 250 रूपयेचा मूद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर लातूर जिल्हासह शेजारील जिल्हे व राज्यात गुन्हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.

नमूद आरोपीविरूध्द पोलीस ठाणे भादा पोलीस ठाणे भादा येथे भारतीय न्याय संहीता प्रमाणे दाखल असून तपास सपोनी महावीर जाधव पोलीस ठाणे भादा हे करीत आहेत. सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक अमोल तांबे लातूर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक मंगेश चव्हाण लातूर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी औसा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक औसा सूनिल रेजितवाड,

सहाय्यक पोलीस निरीक्षक भादा महावीर जाधव, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब माळवदकर, पोलीस अमलदार रामकिशन गूट्टे ,हानमंत पडिले , जमादार,मौला बेग, दत्तात्रय तुमकुटे, फड,योगेश भंडे, सचीन गुंड भागवत गोमारे, सूर्यकांत मगर, प्रकाश राठोड, संदीप राठोड इत्यादींनी केली आहे. गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वातील दोन पथके तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *