पुणे :ऑगस्टमध्ये नवे आर्थिक बदल काय? देशाच्या आर्थिक परिस्थितीत एक ऑगस्टपासून अनेक बदल करण्यात आले असून यामध्ये डिजिटल पेमेंट सिस्टीम, आरबीआयचे नियम, म्युच्युअल फंड आणि कर परताव्यामध्ये बदलांचा समावेश आहे.
ऑगस्टमध्ये नवे आर्थिक बदल काय? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय मध्ये काही बदल केले आहेत ज्यामुळे वापरकर्त्यांना आता एका दिवसात 50 वेळाच फक्त आपल्या बँकेतील शिल्लक रक्कम तपासता येणार आहे.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने म्युच्युअल फंड उद्योगाचे जे नियम असतात त्यामध्ये काही सुधारणा केल्या असून करदात्यांसाठी आयकर विभागाने रिटर्न मिळाल्याची कबुली दिल्यानंतर तीस दिवसांच्या आत रिटर्न पडताळणी आवश्यक आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समिती 6 ऑगस्ट रोजी आपल्या मध्यवर्ती बँक पॉलिसीदारांमध्ये काही प्रमाणात कपात करण्याची शक्यता असल्याचे देखील वर्तवण्यात येत आहे.
आणखी एक महत्त्वाचा बदल ऑटोमॅटिक पेमेंट मध्ये करण्यात आला आहे. युजर्सना त्यांची युटीलिटी बिले, ओटीपी सबस्क्रीप्शन किंवा ईएमआय यासारख्या ऑटोमॅटिक पेमेंट आता केवळ विशिष्ट वेळेतच होणार आहेत.
याशिवाय सुरक्षिता आणि ग्राहकांचे बँकेतील खात्यांवर विशेष लक्ष देण्यात येणार असून बारा महिन्यापेक्षा जास्त काळ निष्क्रिय असलेल्या युपी आयडी आणि खात्यांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार असून त्याचे प्रमाणीकरण करणे अनिवार्य असणार आहे.