मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता; न्यायालयात काय घडलं २००८ मधील मालेगाव बॉम्बस्पोट प्रकरणात न्यायालयाने १७ वर्षानंतर पुराव्याच्या अभावी तब्बल सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यामध्ये एनआयएच्या विशेष न्यायालयाने कोणते निरीक्षण नोंदवले आहेत. याची माहिती घेऊ.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता; न्यायालयात काय घडलं कर्नल पुरोहितने RDX बनविण्याचा सरकारचा युक्तिवाद होता तर ते आरडीएक्स प्रसाद पुरोहित यांनी आणल्याचा कुठलाही पुरावा आढळला नसल्याचे कोर्टाचे म्हणणे आले.
मोबाईलमध्ये कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे कोर्टाचे निरीक्षण तर UAPA सारखा कायदा लावणे योग्य नसल्याचेही एनआयएच्या विशेष न्यायालयाचे निरीक्षण नोंदविले आहे.
बॉम्बस्फोटावेळी वापरण्यात आलेली बाईक साध्वीची होती हे सिद्ध होत नसल्याचे कोर्टाने सांगितले.
मालेगाव बॉम्बस्पोट हा बाईकवर ब्लास्ट झाला नसल्याचे सिद्ध नसल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले.
याशिवाय बॉम्बस्फोटावेळीचे कुठलेही पुरावे आरोपींच्या विरोधात सापडले नसल्याने तब्बल १७ वर्षानंतर ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.