मुंबई : वेगवेगळ्या वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची शिफारस महाविकासआघाडीच्या नेत्यानी केली असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना अभय देण्याचे ठरविल्याचे दिसत आहे. सरकार टिकविण्यासाठी भाजपची हतबलता दिसत असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.
प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी या वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करणे गरजेचे असताना ते भ्रष्टाचार करण्यासाठी मंत्र्यांना मोकळीक देत आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी मंत्र्यांना कितीही दम दिला तरी हे मंत्री दादाला घाबरत नाहीत उलट आहे तसेच पुन्हा पुन्हा वागतात. त्यामुळे हा शेतक-यांचा अपमान आहे.
सरकारच्या या अपयशामुळे आम्ही महाविकासआघाडीचे नेते बसून लवकरच एक आंदोलन करणार आहोत.