दिल्ली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. महायुतीने भाऊ-बहिणीच्या नात्याचा अपमान केला आहे. त्यामुळे सरकारने श्वेतपत्रिका काढून, योजनेचे ऑडिट आणि एसआयटी चौकशी करावी अशी मागणी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथे केली.
त्या संवादातील काही ठळक मुद्दे
१. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा उघड झाल्याने चौकशी करावी.
२. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे पुरूषांच्या खात्यात कसे गेले याचे उत्तर सरकारने द्यावे.
३. इतर योजनांचा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत वळविल्याने त्या योजना कशा चालणार त्याचे उत्तर द्यावे.