मुंबई : जॉर्जिया येथे सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या लेकीनं रचला इतिहास जागतिक बुध्दिबळ विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेक १९ वर्षीय दिव्या देशमुख हिने विश्वविजेते पद पटकावले आहे. १९ व्या वर्षी दिव्याने मिळवलेले यश भारताची मान उंचावणारा ठरला.
मूळ नागपूरची असलेली दिव्या आणि महाराष्ट्राच्या लेकीनं रचला इतिहास भारताची विश्वविजेती असलेली कोनेरू हम्पी यांच्यात शेवटचा सामना झाला. यामध्ये शेवटच्या क्षणात दिव्या दबावात आलेली दिसत असताना कोनेरूने एक चाल खेळली आणि त्याच वेळी दिव्याने क्षणात संधी ओळखून डाव खेळला. कोनेरूला कळले की दिव्या जिंकली, तीने लगेच हात पुढं करून अभिनंदन केले. दिव्या विश्वविजेती तर बनली पण ती ८८ वी भारतीय ग्रॅंडमास्टरही झाली.
दिव्याच्या या यशामध्ये आई नम्रता यांचे मोठे योगदान असून विजयानंतर आईला मिठी मारल्याचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.