पुणे : कुस्तीचं पवारांनी वाटोळ केलं .रोहित पवार यांना कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शरद पवारांनी जाहीर केले असून या पवार नावाच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या फोडा आणि राज्य करा या नितीचा अवलंब शरद पवार यांनी पुन्हा एकदा केला असल्याची टिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
कुस्तीचं पवारांनी वाटोळ केलं क्षेत्रात दोन संघटना उभा करून या क्षेत्राचे वाटोळे करण्यासाठी पवारांनी शड्डु ठोकला आहे. एकाच वर्षी दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्यामध्ये होणारा विजेता कोणता हा अधिकृत पेच आता पैलवानासमोर आणि शासनासमोर निर्माण होणार आहे.
वास्तविक पाहता रोहित पवार यांनी कधी लंगोट लावलाय का ?कधी कुठे कुस्ती खेळली आहे का ? याबरोबरच रोहित पवारांच्या लायक दुसरा कोणीच नाही का? महाराष्ट्रात कुस्ती क्षेत्राला कोणता संदेश शरद पवार देऊ इच्छित आहेत, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती बरोबरच क्रीडा संस्कृतीमध्ये प्रचंड ढवळाढवळ करून या संस्कृतीला नाचवण्याचे नागवण्याचे काम या पवार नावाच्या ईस्ट इंडिया कंपनीने केल्याची टिका हाकेंनी केली आहे.
विविध खेळाच्या संघटनांमध्ये हे पवार कुटुंब अध्यक्षपदापासून विविध पदांवर गेल्या अनेक वर्षांपासून आयत्या बिळावर नागोबा या पद्धतीने चिटकून आहेत. संग्राम बुचडे, आबा सूळ, सिकंदर शेख, बापूराव लोखंडे,असलम काझी, समाधान घोडके, किरण भगत, संदीप आप्पा भोंडवे, माऊली जमदाडे यासारख्या तरुण तुर्क पैलवानांना अध्यक्ष करायला हवे होते.
ईस्ट इंडिया कंपनीचे अध्यक्ष शरद पवार हे 170 विविध संस्था आणि संघटना यांचे अध्यक्ष आहेत असे प्रवीण गायकवाड काही दिवसापूर्वी माझ्यावर टीका करताना बोलले होते वास्तविक पाहता एका व्यक्तीला विविध संस्थांवरती काम करत असताना न्याय द्यायला जमत असेल का? त्याबरोबरच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद शरद पवारांनी संस्थेची घटना बदलूनच तहयात अध्यक्षपद बळकावले आहे त्यामुळे या 170 संघटनांच्या मूळ कागदपत्रांमध्ये मूळ घटनांमध्ये काय काय बदल केले आहे किती लूट खुश्कीच्या मार्गाने यांनी केली आहे हे पहावे लागणार असल्यची टिका लक्ष्मण हाके यांनी केली.