पुणे : राज्याची ७० वर्षात बदनामी झाली नाही तेवढी १५० दिवसात महायुती सरकारच्या काळात झाली असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ही बदनामी गावापासून दिल्ली पर्यंत सुरू आहे. दिल्लीतील खासदार रमी खेळणा-या मंत्र्याचे नाव विचारत होते. त्यामुळे राज्याचे नुकसान होत आहे.
महायुती सरकारमध्ये दर ५० दिवसांनी एखादीतरी विकेट जात असून या सरकारमध्ये काय चालले आहे ते कळायला तयार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ते अस्वस्थ असल्याची कबूली दिली असून ते मित्र पक्षावर खूप नाराज आहेत. विधिमंडळात पत्ते खेळणे, बॅगेत पैसे सापडणे, राज्यातील आत्महत्या देशात गाजत असून लोक आम्हाला विचारत आहेत. याचा आम्हाला आनंद होत नाही तर राज्याचे नुकसान होत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी इतरही विषयावर त्यांनी संवाद साधला.