मुंबई : राज्यभरात पावसाने सगळीकडे दमदार हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यात आता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने राज्यातील या ८ जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या ८ जिल्ह्यांमध्ये संभाजीनगर, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नाशिक आणि परभणीचा समावेश आहे. या जिल्ह्यात पुढील काळात दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वा-यासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले.