मुंबई : पावसाळ्यात सर्दीचा त्रास होणे सामान्य आहे. कारण हवामानात होणारे बदल, ओलावा आणि थंडीमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. त्यासाठी खालील उपाय आणि काळजी घेऊन आपण सर्दीपासून स्वतःची काळजी कशी घेवू शकतो ते पाहू.पावसाळ्यात ही घ्या काळजी,तुम्हाला कधीच सर्दी होणार नाही…
१. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे – पावसाळ्यात ही घ्या काळजी आहारामध्ये व्हिटॅमिन सी असलेले संत्री, लिंबू, आवळा, पेरू तसेच झिंक युक्त काजू, बदाम, डाळी, हळद, आले आणि मध यांचा समावेश करणे. पाणि पिताना ते स्वच्छ, उकळलेले असावे आणि शरीराला पुरेशी झोप असणे गरजेचे आहे.
२. स्वच्छता राखणे – बाहेरचे खाणे टाळणे, घराबाहेरून आल्यानंतर अथवा कुठलेही काम करत असताना ते झाल्यास हात धुणे, ओले कपडे बदलणे, वातावरण कोरडे ठेवणे गरजेचे आहे.
३. शरीरातील लक्षणांकडे लक्ष ठेवणे – सर्दीची सुरुवातीची लक्षणे आढळल्यास गरम पाण्याचा वापर करणे, वाफ घेणे, हळद-दूध, मध आणि आले याचा रस, तुळशीचा काढा घेणे.
४. सर्दी झाली तर काय काळजी घ्याल – ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास सुरू झाला असेल तर तात्काळ डॉक्टरचा सल्ला घेणे, स्वतः औषधे न घेता डॉक्टरला विचारून घेणे आणि याकाळात विश्रांती घेणे.
जर तुम्हाला अशीच इतर काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा त्यानुसार आम्ही देऊ.