जालना, योगेश काकफळे : जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील गणपती इंग्लिश स्कूल येथे आदिवासी वसतिगृहात परतुर येथील दोन बहीण भाऊ शिकायला होते. त्यातील बहीण वर्ग चौथी तर भाऊ हा वर्ग दुसरी मध्ये शिक्षण घेत होता. यातील दुसरीत शिकणारा अजय पवार 22 जुलै रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मृत अवस्थेत आढळून आला.
भोकरदनमध्ये दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा त्याच्याच दोन मित्रांनी गळा आवळून केला खून! सदर घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालय दाखल केला. त्यावेळी अजय पवार या चिमुकल्या विद्यार्थ्याला डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
सदर चिमुकल्याच्या गळ्याला आवळल्याच्या खुणा डॉक्टरांना व पोलिसांना आढळून आल्या असून सदर चिमुकल्याचा मृत्यू हा गळा आवळून केला असल्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे.
या प्रकरणात सदर मयत मुलाचे दोन अल्पवयीन मित्र पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सध्या सुरू आहे.