मुंबई : मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या दोन्ही ‘झा’ला कल्याण न्यायालयात पोलिसांनी केलं हजर कल्याणच्या नांदिवली परिसरात एका रुग्णालयात रिसेप्शनिस्टचं काम करणाऱ्या मराठी तरुणीला अमराठी असलेल्या गोकुळ झा या व्यक्तीने मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर हे प्रकरण चांगल चिघळलं. अखेर मनसैनिकांनीच या गोकुळ झा ला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केलं.
मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या दोन्ही ‘झा’ला कल्याण न्यायालयात पोलिसांनी केलं हजर मानपाडा पोलिसांनी काही वेळापूर्वीच कल्याणच्या न्यायालयात या प्रकरणातील गोकुळ झा आणि रणजीत झा हे दोन्ही आरोपींना हजर केले आहे. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या या गोकुळ झा आणि रणजीत झा या दोघांना न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावण्याची शक्यता आहे.
k7d34k