मुंबई : यावर्षीचा गणपती उत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे. त्यानिमित्त मुंबई आणि इतर भागातील भाविकांना आपल्या गावी जाण्यासाठी भारतीय रेल्वेच्या वतीने खास २५० रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत. भाविकांना या विशेष रेल्वे गाड्यांमुळे गणपती उत्सव आनंदात साजरा करता येणार आहे. मुंबईतील लोक गणपती उत्सव काळात कोकणात जात असतात त्यानिमित्ताने विशेष रेल्वे सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, मडगावकरिता धावणार आहेत. या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण बुकिंग २४ जुलै पासून सुरुवात होणार आहे. नवीन सुरू करण्यात आलेल्या ज्या विशेष गाड्या आहेत त्यांचे आपण माहिती घेऊ.
१) सीएसएमटी-सावंतवाडी रोड, डेली स्पेशल ०११५१ ही विशेष गाडी २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर पर्यंत दररोज सकाळी ००.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघेल (२० फेऱ्या) आणि त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर ०११५२ विशेष गाडी २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर पर्यंत दररोज १५.३५ वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल (२० फेऱ्या) आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
२) सीएसएमटी- सावंतवाडी रोड, डेली स्पेशल०११०३ ही विशेष गाडी २२ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर पर्यंत दररोज १५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघेल (१८ फेऱ्या) आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर ०११०४ ही विशेष गाडी २३ ऑगस्ट ते ०९ सप्टेंबर पर्यंत दररोज ०४.३५ वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल (१८ फेऱ्या) आणि त्याच दिवशी १६.४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
३) सीएसएमटी-रत्नागिरी, डेली स्पेशल०११५३ ही विशेष गाडी २२ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर पर्यंत दररोज सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघेल (१८ फेऱ्या) आणि त्याच दिवशी रात्री १०.१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. तर ०११५४ ही विशेष गाडी २३ ऑगस्ट ते ०९ सप्टेंबर पर्यंत दररोज पहाटे ४.०० वाजता रत्नागिरीहून निघेल (१८ फेऱ्या) आणि त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
४) एलटीटी-सावंतवाडी रोड, डेली स्पेशल०११६७ ही विशेष गाडी २२ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर पर्यंत दररोज रात्री ९.०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघेल (१८ फेऱ्या) आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर ०११६८ ही विशेष गाडी २३ ऑगस्ट ते ०९ सप्टेंबर पर्यंत दररोज ११.३५ वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल (१८ फेऱ्या) आणि दुसऱ्या दिवशी ००.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
५) एलटीटी-सावंतवाडी रोड, डेली स्पेशल ०११७१ विशेष गाडी २२ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर पर्यंत दररोज सकाळी ०८.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघेल (१८ फेऱ्या) आणि त्याच दिवशी रात्री ९.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर ०११७२ विशेष गाडी २२ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर पर्यंत दररोज २२.३५ वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल (१८ फेऱ्या) आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
६) एलटीटी-सावंतवाडी रोड, साप्ताहिक विशेष०११२९ ही साप्ताहिक विशेष गाडी २६ ऑगस्ट, ०२ सप्टेंबर आणि ०९ सप्टेंबर रोजी दर मंगळवारी सकाळी ०८.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघेल आणि त्याच दिवशी रात्री २२.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर ०११३० ही साप्ताहिक विशेष गाडी २६ ऑगस्ट, ०२ सप्टेंबर आणि ०९ सप्टेंबर रोजी दर मंगळवारी रात्री २३.२० वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
७) एलटीटी-मडगाव, साप्ताहिक विशेष०११८५ ही साप्ताहिक विशेष गाडी २७ ऑगस्ट आणि ०३ सप्टेंबर रोजी दर बुधवारी (२ फेऱ्या) लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.४५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी २.३० वाजता मडगावला पोहोचेल. तर ०११८६ ही साप्ताहिक विशेष गाडी २७ ऑगस्ट आणि ०३ सप्टेंबर रोजी दर बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता मडगावहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
८) एलटीटी-मडगाव, एसी साप्ताहिक विशेष ०११६५ एसी साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी, २६ ऑगस्ट, ०२ सप्टेंबर आणि ०९ सप्टेंबर (३ फेऱ्या) रोजी सकाळी ००.४५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी २.३० वाजता मडगावला पोहोचेल. तर ०११६६ एसी साप्ताहिक विशेष गाडी २६ ऑगस्ट, ०२ सप्टेंबर आणि ०९ सप्टेंबर (३ फेऱ्या) दर मंगळवारी १६.३० वाजता मडगावहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
९) पुणे-रत्नागिरी, साप्ताहिक विशेष ०१४४७ ही साप्ताहिक विशेष गाडी २३ ऑगस्ट, ३० ऑगस्ट आणि ०६ सप्टेंबर (३ फेऱ्या) दर शनिवारी पुण्याहून रात्री ००:२५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११:५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. तर ०१४४८ ही साप्ताहिक विशेष गाडी २३ ऑगस्ट, ३० ऑगस्ट आणि ०६ सप्टेंबर (३ फेऱ्या) दर शनिवारी सायंकाळी ५:५० वाजता रत्नागिरीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०५:०० वाजता पुण्यात पोहोचेल.
१०)पुणे-रत्नागिरी एसी साप्ताहिक स्पेशल (६ सेवा)०१४४५ एसी साप्ताहिक विशेष गाडी २६ ऑगस्ट, ०२ सप्टेंबर आणि ०९ सप्टेंबर (३ फेऱ्या) दर मंगळवारी पुण्याहून ००:२५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी ११:५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. तर ०१४४६ एसी साप्ताहिक विशेष गाडी २६ ऑगस्ट, ०२ सप्टेंबर आणि ०९ सप्टेंबर (३ फेऱ्या) दर मंगळवारी १७:५० वाजता रत्नागिरीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ०५:०० वाजता पुण्यात पोहोचेल.
११) दिवा-चिपळून-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ०११५५ मेमू स्पेशल २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर (१९ फेऱ्या) पर्यंत दिवा येथून सकाळी ७.१५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी २ वाजता चिपळूण येथे पोहोचेल. तर ०११५६ मेमू स्पेशल २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर (१९ फेऱ्या) पर्यंत चिपळूणहून १५.३० वाजता निघेल आणि त्याच दिवशी २२.५० वाजता दिवा येथे पोहोचेल.