मार खाणार आमचा कार्यकर्ता, पळून जाणार पडळकरचे… आव्हाडांचे रात्री उशिरा सरकारवर गंभीर आरोप

InShot 20250718 104343300

मुंबई : विधान भवनात झालेल्या राड्यानंतर रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आणि गाडीतून घेऊन जात होते. त्यावेळी आव्हाड यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.

ज्या पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता असलेल्या नितीन देशमुख याला विधानभवनात मारहाण केली त्यांना न अटक करता देशमुख यांनाच अटक केली आणि पडळकर यांचे मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले. शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला असल्याचा आरोप केला.

आव्हाड म्हणाले की, मार खाणार आमचा कार्यकर्ता आणि पळून जाणार पडळकरचे कार्यकर्ते तर प्रशासन कारवाई त्यांच्यावर करायचे सोडून आमच्याच कार्यकर्त्यांवर करत आहे. सत्ताधाऱ्यांना प्रशासन इतक शरण गेलेलं मी आजवर पाहिल नव्हतं. या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नसल्याचा आरोप केला.

त्यानंतर रात्री उशिरा १ ते २ च्या दरम्यान देशमुख यांना पोलीस स्टेशनला जात असताना आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवली. यावेळी पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना फरफटत बाजूला केले आणि देशमुख यांना पोलीस घेऊन गेले. त्यानंतर चिडलेल्या आव्हाड यांनी सरकार वर गंभीर आरोप केले. यावेळी आमदार रोहित पवार हे देखील घटना स्थळी आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *