मुंबई : भारतात २०२५ मध्ये सर्वात जास्त नफा कमविणारा चित्रपट कोणता आहे तुम्हाला माहिती आहे का? फक्त ७ कोटींची गुंतवणूक असलेल्या या चित्रपटाने १२०० टक्के नफा कामविला असून तो २०२५ मधील सर्वात फायदेशीर असलेला चित्रपट ठरला आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिला का?
बॉक्स ऑफिसवर एका छोट्या चित्रपटाने ७ कोटी रुपयांचा नफा कमावत छावा, सितारा जमीन पर, सिकंदर सारख्या चित्रपटाला जे जमले नाही ते करून दाखवले आहे. जी कामगिरी अक्षय कुमार, सलमान खान आणि मोहनलाल यांच्या सर्वात मोठ्या हिट चित्रपटांनाही करता आली नाही ती कामगिरी टुरिस्ट फॅमिली याने करून दाखवली आहे.
टूरिस्ट फॅमिली हा २०२५ या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात फायदेशीर भारतीय चित्रपट आहे. अभिशन जीवनथ दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात ९० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आणि हा नफा जवळपास १२००% एवढा आहे. टूरिस्ट फॅमिली हे खरंतर एक विनोदी नाटक आहे ज्यामध्ये एम. सशीकुमार, सिमरन, मिथुन जय शंकर आणि कमलेश जगन मुख्य भूमिकेत आहेत. २९ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले आणि पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने २३ कोटींची कमाई केली तर दुसऱ्या आठवड्यात त्याने चांगली कामगिरी केली आणि आणखी २९ कोटींची भर घातली. पाच आठवड्यांनंतर चित्रपटाने अखेर जगभरात ९० कोटींची कमाई केली. ज्यामध्ये भारतातील ६२ कोटींचा समावेश होता.
५ आठवड्यात विक्रमी नफा कमविल्यामुळे टुरिस्ट फॅमिली हा चित्रपट सर्वात जास्त नफा कमविणारा ठरला असून तो तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर एकदा बघायला हवाच.